

Online Degree Opportunity
Sakal
पुणे - बदलत्या काळानुसार आणि नोकरीच्या स्वरूपानुसार शिक्षण पद्धतीतही मोठे बदल होत आहेत. नोकरी, व्यवसाय सांभाळून आपले कौशल्य आणि पदवी वाढवू इच्छिणाऱ्या नोकरदार वर्गासाठी ऑनलाइन शिक्षण हा उत्तम पर्याय ठरत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ‘एमबीए’ आणि ‘एमसीए’ यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन वर्गांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.