
पुणे : मंत्रीमंडळाचा विस्तार करायला का घाबरता- अजित पवार
बारामती : राज्यात अनेक ठिकाणी पूरामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा स्थितीत मंत्रीमंडळाची आवश्यकता असताना मंत्रीमंडळ का स्थापन होत नाही, मंत्रीमंडळाचा विस्तार करायला का घाबरत आहेत हे काही समजत नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले.
बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पूरग्रस्तांना मदतीची गरज असताना मंत्रीमंडळच अस्तित्वात येत नाही ही दुर्देवी बाब असल्याचे सांगून ते म्हणाले, माझ्यासह अनेक आमदारांनी राज्यपाल व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पूरग्रस्तांचे जे नुकसान झाले आहे, काही भागात गोगलगाईंचा प्रादुर्भाव झालेला आहे.
काही भागात पिके उध्वस्त झाली आहेत, काही भागात आत्महत्या करण्यापर्यंत लोक पावले उचलायला लागले आहेत, राज्याला हे भूषणावह नाही त्या मुळे तातडीने त्यांना मदत केली पाहिजे, मनुष्य व प्राण्यांची हानी झाली आहे, शेतक-यांचे नुकसान झाले आहे, घरांची पडझड झाली आहे, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, संपर्क तुटला आहे. पुन्हा नागपूरच्या परिसरात पाऊस सुरु झाला आहे.
लवकर मंत्रीमंडळ अस्तित्वात येऊन तातडीची मदत व्हायला हवी व तातडीने अधिवेशन बोलवायला हवे, दरवर्षी जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होते आता ऑगस्ट उजाडला तरी अधिवेशन होईना. महिना उलटून गेल्यावरही यांना मंत्रीमंडळाचा मुहूर्तच मिळेना का कोठून ग्रीन सिग्नल मिळेना का त्यांच्यात एकवाक्यता होईना, कशाला मंत्रीमंडळाचा विस्तार करायला ते घाबरत आहेत हे समजायला मार्ग नाही, त्या साठीच राज्यपालांना भेटलो, आता जनतेनेच पाहावे की त्यांचा कारभार कसा सुरु आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले.
Web Title: Opposition Leader Ajit Pawar Criticized Chief Minister And Deputy Chief Minister Cabinet Expansion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..