उद्धव ठाकरेंनी फोनला उत्तर न दिल्यानं वाटा खुंटल्या; वाचा फडणवीसांची विशेष मुलाखत

मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 14 डिसेंबर 2019

देवेंद्र फडणवीस यांनी आज, सकाळ माध्यम समूहाला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी सत्ता स्थापनेतील घडामोडींचा गौप्यस्फोट केला. शिवसेना-भाजप युती का बिघडली? चूक नेमकी कोणाची? भाजपनं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला की नाही? यावर फडवणीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. 

मुंबई : "हिंदुत्ववादी पक्षांनी एक राहावे, कित्येक वर्षांची युती अभंग राहावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर मातोश्रीवर चर्चेस जाण्यास तयार होते. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या एकाही दूरध्वनीला उत्तर न दिल्याने वाटा खुंटल्या,' असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. निवडणूक निकालानंतर मुद्रित माध्यमांत सर्वप्रथम त्यांनी "सकाळ'शी गप्पा मारल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सत्ता स्थापनेनंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही चॅनेल्सना मुलाखती दिल्या आहेत. आज, त्यांनी सकाळ माध्यम समूहाला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी सत्ता स्थापनेतील घडामोडींचा गौप्यस्फोट केला. शिवसेना-भाजप युती का बिघडली? चूक नेमकी कोणाची? भाजपनं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला की नाही? यावर फडवणीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. 

Image result for devendra fadnavis uddhav thackeray esakal

आणखी वाचा - स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक करू नका : फडणवीस 

फडणवीस म्हणाले, 'शिवसेना त्या काळात दररोज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी बोलत होती. आता तर ते सोनिया गांधींच्या सल्ल्यानेच चालतात. अमितभाईंशी मुख्यमंत्रिपदाबाबत काय ठरले होते हे महत्त्वाचे असे शिवसेना वारंवार म्हणते. पण, युती म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला काय शब्द दिला होता ते महत्त्वाचे नाही काय? शिवसेनेच्या या घुमजावमुळे त्यांचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटेल. शिवसेनेसाठी दरवाजे कायम उघडे आहेत. पण संवाद शिवसेनेने स्वत:हून संपवला असल्याने त्यांनाच पुढाकार घेऊन तो सुरू करावा लागेल.'' शिवसेना दूर गेली याचे मनापासून दु:ख वाटते, माझे मित्र उद्धव ठाकरे यांचा एकही शब्द मुख्यमंत्रिपदावरून काम करताना मी खाली पडू दिला नव्हता, असेही फडणवीस म्हणाले.

(सविस्तर मुलाखत उद्याच्या दैनिक सकाळमध्ये वाचा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition leader devendra fadnavis special interview to sakal media group