गृहमंत्र्यांच्या फडणवीसांवरील टीकेला प्रवीण दरेकरांनी दिले प्रत्युत्तर

टीम ई-सकाळ
Tuesday, 6 October 2020

फडणवीस यांच्या या भूमिकेवरून गृहमंत्री देशमुख यांनी त्यांना 'तुम्ही, गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का?' असा प्रश्न विचारला आहे. तसेच, देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर टीका केली आहे.

पुणे : बिहारमधील राजकीय पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिला. बिहारच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपाला आणि भाजपप्रणित आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळविण्यासाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फडणवीस यांच्या या भूमिकेवरून गृहमंत्री देशमुख यांनी त्यांना 'तुम्ही, गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का?' असा प्रश्न विचारला आहे. तसेच, देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर टीका केली आहे. त्याला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी दरेकर म्हणाले,  'गेल्या काही दिवसापासून अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावरून टीका-टिप्पणी सुरू आहे. त्यावर एम्स रुग्णालयमार्फत अद्याप कोणत्याही प्रकाराचा अहवाल दिला नसताना, त्या संदर्भात प्रतिक्रिया देण्याची एवढी घाई का केली जात आहे.' शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यातील त्यांची भाषा निंदनीय असून, अब्दुल सत्तार यांच्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी देखील दरेकर यांनी केली. 

आणखी वाचा - पुणे-लोणावळा लोकल आता सुरू होणार!

'सगळ्या फेक अकाउंटवर कारवाई करा'
सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने फेक अकाउंट आहेत. मात्र, काही विशिष्ट अकाउंटवर सायबर विभागामार्फत कारवाई करण्यात आली असून, सायबर विभागामार्फत सर्वच फेक अकाउंटवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे दरेकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition leader pravin darekar statement home minister anil deshmukh on devendra fadnavis