तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरास विरोध

बेमुदत उपोषण सुरु
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर करु नये या मागणीसाठी उपोषणास बसलेले ग्रामस्थ.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर करु नये या मागणीसाठी उपोषणास बसलेले ग्रामस्थ.sakal

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील सध्या ग्रामपंचायत मालकीच्या ताब्यात असलेले दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुसरीकडे खासगी जागेत स्थलांतर करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून, गुरुवारपासून ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ व शिरूर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख चेतना ढमढेरे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे खजिनदार महेशबापू ढमढेरे, माजी उपसरपंच महेंद्र पवार, ऍड सुहास ढमढेरे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य ॲड सुरेश भुजबळ, संतोष ढमढेरे, ऍड शरद ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, सुनील ढमढेरे, दिलीप शिंदे, बाबू ढमढेरे, हनुमंत भुजबळ आदी ग्रामस्थानी उपोषणात सहभाग घेतला आहे.

दरम्यान, येथील दुय्यम निबंधक कार्यालय दुसरीकडे खासगी जागेत स्थलांतर करू नये असे निवेदन बाजार समितीचे माजी सभापती अरविंद ढमढेरे यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार ऍड अशोक पवार, जिल्हाधिकारी व नोंदणी महानिरीक्षक यांना दिले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर करु नये या मागणीसाठी उपोषणास बसलेले ग्रामस्थ.
Bhima Koregaon Case: सुधा भारद्वाज यांना जामीन; तब्बल तीन वर्षांनी कोर्टाकडून सुटका

दरम्यान, येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय पार्किंग, प्रशस्त व आवश्यक जागा आणि इतर सुविधा नसल्याच्या कारणावरून दुसरीकडे खासगी जागेत स्थलांतर होणार असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर, येथील दुय्यम निबंधक कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित करू नये या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरु असून, ग्रामस्थांना न्याय मिळेपर्यंत उपोषण चालूच राहणार असल्याचे माजी सभापती आरती भुजबळ यांनी सांगितले.येथील कार्यालयाची इमारत सुसज्य असून, नियमानुसार काही कमतरता असल्यास त्यात सुधारणा केली जाईल असे भुजबळ यांनी सांगितले. स्थलांतर प्रकरणात आमदार अशोक पवार यांनी विशेष लक्ष घालून ग्रामस्थांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी आमदार पवार यांच्याकडे केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

सध्या असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयामुळे ग्रामपंचायतीला मासिक उत्पन्न मिळत असून, परिसरात लहान मोठे व्यवसायिक व्यवसाय करीत आहेत. सध्याचे कार्यालय गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे विविध सुविधा आहेत. असे असताना कोणतेही सबळ कारण नसताना सध्या ग्रामपंचायत जागेत असणारे दुय्यम निबंधक कार्यालय इतरत्र खासगी जागेत स्थलांतरित करू नये. कार्यालय स्थलांतरामुळे ग्रामस्थ व व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com