

Pune Municipal Corporation
पुणे - पुणे पालिकेच्या मालमत्तांना नाव देताना आता सत्ताधाऱ्यांचीच 'मनमानी' चालणार आहे. रस्ते, चौक आणि उड्डाणपुलांच्या नामकरणासाठी संबंधित प्रभागातील सर्व चार नगरसेवकांच्या संमतीची अट शिथिल करून त्याऐवजी तिघांची स्वाक्षरी असल्यास नाव देणे शक्य होणार आहे. या नव्या नियामामुळे ज्या प्रभागात विरोधीपक्षाचा नगरसेवक असेल तर त्यांना बेदखल केले जाणार आहे.