Dilip Walse Patil : डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका, 'थोडा वेळ देऊ, त्यानंतर पुढील रणनीती ठरवू'

डिंभे-माणिकडोह १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्यामुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
Atul Benake, Dilip Walse Patil and Shivajirao Adhalrao Patil

Atul Benake, Dilip Walse Patil and Shivajirao Adhalrao Patil

sakal

Updated on

मंचर - कुकडी प्रकल्पाच्या ५ हजार ७०४.५० कोटी रुपयांच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये मूळ प्रकल्प अहवालात समावेश नसलेल्या डिंभे-माणिकडोह १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा समावेश करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

त्यामुळे बोगद्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध कायम ठेवणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सध्या त्यांना निर्णयासाठी थोडा वेळ देऊ. त्यानंतर पुढील रणनीती ठरवू.’ अशी भूमिका माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com