
पुणे : ‘‘इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा हा निर्णय शैक्षणिक नसून तो राजकीय व सरकाच्या इतर सामाजिक धोरणांनी प्रेरित आहे. पुढील पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आम्ही सरकारच्या या निर्णयाचा निषेध करतो’’, अशी भूमिका मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केली. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशाराही देशमुख यांनी दिली.