

पुणे: खराडी येथील नामांकित 'ओरॅकल बर्थ अँड रीबर्थ क्लिनिक'च्या पहिल्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महिलांसाठी 'हाय-रिस्क एचपीव्ही' तपासणी शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले होते. स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. पल्लवी टेकाळे-देशपांडे यांच्या पुढाकाराने या आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.