भीमाशंकर येथील पोलिस चौकीबाबत मंत्र्यांनी दिला 'हा' आदेश; वाचा सविस्तर

डी. के. वळसे पाटील 
मंगळवार, 30 जून 2020

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पोलिस चौकी आठ वर्षांपूर्वी मंजूर झाली आहे. या चौकीसाठीच्या जागेचे भूसंपादन त्वरित करण्याचे आदेश मंत्री वळसे पाटील यांनी दिले आहेत.   

मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पोलिस चौकी आठ वर्षांपूर्वी मंजूर झाली आहे. चौकीसाठी, पोलिस उपनिरीक्षक व १२ पोलिस कर्मचाऱ्यांच्या नेमणुका त्वरित झाल्या पाहिजेत. तसेच मंचर येथे पोलिस ठाणे इमारत मंजूर आहे. त्यासाठी दीड हेक्टर जागा संपादनाबाबत सद्यस्थितीचा अहवाल खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांनी सादर करावा असे आदेश राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. मंचर (ता.आंबेगाव) येथे शासनाच्या विविध कामांच्या  आढावा बैठकीत ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

ते म्हणाले, ''आंबेगाव तालुक्यात मंड लअधिकारी व तलाठीच्या किती जागा रिक्त आहेत.असेच तहसील कचेरीत कॅन्टीन मंजूर आहे. पण ते का सुरु झाले नाही. पुनर्वसन गावठाणातील अजून किती ग्रामपंचायती मंजूर नाहीत. क्रीडा संकुल परिसरात उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्यांसाठी निवासस्थाने बांधली आहेत. पण कामे अपूर्ण असल्याने वापर होत नाही. आंबेगाव तालुका पंचायत समितीत फर्निचरसाठी साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. पण अजून कामाचे अंदाजपत्रक प्राप्त झाले नाही. या बाबतचा आढावा  प्रांत अधिकारी यांनी  संबंधित अधिकाऱ्यांकडून ताबडतोब घ्यावा.'' 

आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी चर्चेत भाग घेतला. आंबेगाव तालुक्यात २०१२ पासून एक हजार २०० वन हक्क दावे महसूल खात्याकडे तहसीलदार कचेरी व प्रांत कार्यालय प्रलंबित आहेत. हे दावे निकाली काढावेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order of Minister Walse Patil regarding acquisition of land for police post at Bhimashankar