
पुणे - ‘अवयव निकामी झाल्याचे दुःख काय असते ते मी भोगलंय. वयाच्या तिसऱ्या वर्षी मधुमेहाचे निदान झाले. त्यामुळे २४ व्या वर्षी दोन्ही मूत्रपिंडही (किडनी) निकामी झाली. मूत्रपिंड व स्वादुपिंड (पॅनक्रियाज) मिळेपर्यंत डायलिसिस करणे, रक्त तपासणी करणे यासाठी माझ्या संपूर्ण शरीरावर तब्बल ३१ हजार वेळा सुया टोचून घेतल्यात.