जैविक पद्धतीने कीड-रोग व्यवस्थापनावर शेतकरी-शास्त्रज्ञ मंच बैठकीत मार्गदर्शन

जैविक पद्धतीने कीड-रोग व्यवस्थापनावर  शेतकरी-शास्त्रज्ञ मंच बैठकीत मार्गदर्शन
Published on

जैविक पद्धतीने कीड-रोग
व्यवस्थापनावर मार्गदर्शन

शेतकरी-शास्त्रज्ञ मंच बैठकीचे आयोजन

अॅग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : खरीप पिकांमध्ये वाढत असलेल्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळून जैविक पद्धतीने प्रभावी व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने खुदनापूर (ता. मेहकर) येथे झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या ४२ व्या सभेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मौजे खुदनापूर येथील निंबाजी लखाडे यांच्या शेतावर झालेल्या या सभेचा प्रमुख विषय ‘खरीप पिकांतील कीड व रोगांचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन’ हा होता. या वेळी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ.अमोल झापे, कृषी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. दिनेश कानवडे, केव्हीकेचे विषय विशेषज्ज्ञ(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ. गणेश काळूसे, सहायक प्रा. डॉ. लाटकर, केव्हीकेच्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष मोहन जगताप, तसेच कृषी संशोधन केंद्राच्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष प्रकाश सपकाळ उपस्थित होते.
डॉ.झापे यांनी पिकांचे नियमित निरीक्षण करून किडी व रोगांचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेत ओळखण्याचे आवाहन केले. डॉ. कानवडे व डॉ. लाटकर यांनी खरीप पिकांची सद्यस्थिती आणि आगामी पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. गणेश काळूसे यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायातील विविध बाबींवर माहिती दिली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील समस्या व अनुभव शास्त्रज्ञांसमोर मांडले. त्यावर तज्ज्ञांनी परिस्थितीनुरूप उपाय सुचविले. शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या थेट शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचवून तांत्रिक मार्गदर्शन मिळवून देण्याचे महत्त्व मोहन जगताप व प्रकाश सपकाळ यांनी अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com