संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे :विभागीय आयुक्त

Organizations and charities should come forward to help said Divisional Commissioner
Organizations and charities should come forward to help said Divisional Commissioner

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी  साहित्याची गरज असून, संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी यांना एन 95 व सर्जिकल मास्क आणि वैद्यकीय साहित्याची गरज आहे.  अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची आवश्यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्था आदीं दानशूर व्यक्तींनी साहित्य स्वरुपात मदत करावी. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवण्‍यात यावा तसेच मदत द्यायला जास्त लोकांनी येवू नये, तीन-चार लोकांनीच यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action या संकेतस्थळावरूनही मदत  करता येईल. मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश विभागीय आयुक्त कार्यालयातही जमा करता येऊ शकतो.
कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक संस्था व विविध कंपन्या यांनी सामाजिक बांधिलकी कार्यक्रम अंतर्गत पीपीई किट, ग्लोव्हज, फेस मास्क, ट्रिपल लेअर मास्क, एन- 95 मास्क, सॅनिटायझर, गॉगल, शु कव्हर, गम बूट, सोडियम हायपोक्लोराईट 5 टक्के द्रावण, फेस शिल्ड, व्हेंटीलेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर, पल्स ऑक्सिमीटर यासह वैद्यकीय उपकरणाची आरोग्य विभागाला गरज असल्याने पुणे विभागातील 5 जिल्ह्यांतील मदत करणाऱ्या इच्छुकांनी पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकरीता डॉ. संजय देशमुख- 9422033439, डॉ. नंदा ढवळे-  9822428560, गौरी पिसे- 9890408987, गिरीश कुऱ्हाडे- 7798981199 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

पुणे विभागातील अन्नधान्य दान करणाऱ्या इच्छुकांनी पुणे जिल्हा : भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी 020-26061013,  अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी 020-26123743, 
सातारा जिल्हा : स्नेहल किसवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 02162-234840, सांगली जिल्हा: वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 0233-2600512, कोल्हापूर जिल्हा : दत्तात्रय कवितके जिल्हा पुरवठा अधिकारी 0231- 265579,
सोलापूर जिल्हा : उत्तम पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी 0217-2731003 यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com