
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय येथील सभागृहात दोन जून रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेंशन अदालतचे आयोजन
पुणे - राज्य सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पुणे कोशागार कार्यालयामार्फत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय येथील सभागृहात दोन जून रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
या पेंशन अदालतीसाठी प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्कदारी) मुंबई कार्यालयाचे अधिकारी निवृत्तिवेतन संबंधी समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पेंशन संबंधी समस्या, अडचणी सोडविण्यासाठी निवृत्तिवेतन धारकांनी या अदालतमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा वरिष्ठ कोशागार अधिकारी शेखर शेटे यांनी केले आहे.
पेंशन धारकांसाठी विविध उपक्रम
प्रधान महालेखाकार कार्यालयाने निवृत्तिवेतन धारकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. साप्ताहिक ऑनलाइन पेंशन संवाद, २४ तास उपलब्ध टोल फ्री क्रमांक १८००-२२ ००१४, २४ बाय ७ व्हाइस मेल क्रमांक ०२०-७११७७७७५, माहिती वाहिनी, पेंशन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र, निवृत्तिवेतन धारकांकरिता समर्पित ई-मेल helpdesk.mh1ae@cag.govin या उपक्रमांची माहिती या कार्यक्रमात देण्यात येईल, असे शेटे यांनी सांगितले.
Web Title: Organizing A Pension Court For Retired Employees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..