पुण्यात ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

बारावी उत्तीर्ण, पदवीधर आणि पदविका अभ्यासक्रमासाठी फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, ऑटोमोबाईल, टूल अँड डाय मेकर यासह विविध प्रकारची पदे उपलब्ध.
Job
JobSakal

पुणे - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सोमवारी (ता. ४) पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बारावी उत्तीर्ण, पदवीधर आणि पदविका अभ्यासक्रमासाठी फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, ऑटोमोबाईल, टूल अँड डाय मेकर यासह विविध प्रकारची पदे उपलब्ध आहेत. रोजगार नोंदणी असलेल्या उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. मेळाव्यात सहभागी होण्याबाबत समस्या असल्यास कार्यालयाच्या ०२०- २६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधावा. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देऊन पसंतीनुसार अर्ज सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com