नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांकडून सद्भावना रॅलीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Organizing rally by doctors to show respect patients who have recovered from covid19 pune

नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांकडून सद्भावना रॅलीचे आयोजन

हडपसर : डॉक्टर आणि समाजाचे नाते दृढ होऊन त्यांच्यात अधिकाधिक संवाद व्हावा व कोव्हिडं मधून तंदुरुस्त झालेल्या रुग्णांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने परिसरातून सद्भावना रॅली काढण्यात आली होती. "डॉक्टर डे' च्या निमित्ताने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन आबणे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, डॉ.स्नेहल काळे, डॉ. एस. के. राऊत, माजी नगरसेवक वैशाली बनकर, विजय देशमुख, योगेश ससाणे, उज्वला जंगले, सुनील बनकर, मारुती तुपे, विजया वाडकर, पल्लवी सुरसे, प्रशांत सुरसे, शितल शिंदे, राजेंद्र कोंडे, जीवन जाधव, अविनाश काळे, संजय शिंदे आदींसह हडपसर मेडिकल असोसिएशनचे सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असोसिएशनच्या विविध भागातील सदस्यांनी मगरपट्टा, सासवड रस्ता, सोलापूर रस्ता, ससाणेनगर रस्ता आदी भागातून वेगवेगळ्या रॅली गाडीतळ येथे आल्या होत्या. याठिकाणी असोसिएशनच्या वतीने कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, नोबल हॉस्पिटलच्या वतीने परिसरातील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. डॉ. राज कोद्रे यांनी त्याचे संयोजन केले. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन आबणे म्हणाले, "डॉक्टर्स डे निमित्त आम्ही नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी “सद्भावना रॅली" आयोजित केली होती. हा नाविन्यपूर्ण प्रयोग करून सर्वसाधारण रूग्णांच्या प्रति डॉक्टरांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.'

असोसिएशनचे सदस्य डॉ. राज कोद्रे, डॉ. अजय माने, डॉ. स्वप्नील लडकत, डॉ. राहुल झांजुर्णे, डॉ. हिमांशू पेंडसे, डॉ. वंदना आबणे, डॉ. राज कोद्रे, डॉ. सत्यवान आटपाडकर, डॉ. अमर शिंदे, डॉ. चंद्रकांत हरपळे, डॉ. शंतनु जगदाळे, डॉ. मंगेश वाघ, डॉ. तानाजी हंबीर, डॉ. दादा कोद्रे व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Web Title: Organizing Rally By Doctors To Show Respect Patients Who Have Recovered From Covid19 Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..