esakal | दिपोत्सवासाठी पणत्या काम करण्याची अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांची लगबग | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

ओळ-दापोडी येथे सरस्वती अनाथ आश्रमात  दिवाळी सणासाठी पणत्या काम करताना विद्यार्थी.

दिपोत्सवासाठी पणत्या काम करण्याची अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांची लगबग

sakal_logo
By
रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : गत वर्षापासून कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद होती यामुळे विद्यार्थी मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. शाळेतील आनंद व ईतर कला गुणांमधे रमणा-या विद्यार्थ्यांवर निर्बंध आले होते. यात अनाथ आश्रमातील निवासी असलेल्या विद्यार्थ्यांची कैफियत निराळीच आश्रम हेच घर मानून शिक्षण घ्यायचे. शाळा महाविद्यालये सुरू होत असल्याने या विद्यार्थ्यांमधे चैतन्य निर्माण झाले आहे. दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमातील विद्यार्थी दिपोत्सवासाठी दरवर्षी पणत्या रंगकाम करून स्वतासाठी आश्रमाच्या खर्चासाठी हातभार लावतात.

हेही वाचा: पुणे - अपघातग्रस्त टँकर हटवण्यासाठी मुंबईवरून मागवली क्रेन

यासाठी पणत्याचा कच्चा माल ठोकदरात कुंभार व्यावसायिकांकडून घेतला जातो. दरवर्षी तीन ते चार हजार पणत्या रंगकाम करून माफक दरात परिसरात नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करून ऑर्डर प्रमाणे विद्यार्थी विक्री करतात. या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला परिसरातून मोठ्याप्रमणावर प्रतिसाद मिळतो. या आश्रमातील विद्यार्थी परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय, व आयटीआय मधून शिक्षण घेतात. आश्रमचालकआश्रमचालक देविदास सुरवसे, शिक्षक महादेव गायकवाड, विश्वनाथ साठे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

loading image
go to top