esakal | ...अन्यथा मंत्रालयावर गाई-म्हशींसह पायी मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Cows

...अन्यथा मंत्रालयावर गाई-म्हशींसह पायी मोर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारने (State Government) शेतकऱ्यांना दुधाला (Milk) किमान हमी भाव देण्याबाबतचा निर्णय त्वरित घ्यावा. अन्यथा या मागणीसाठी गाई-म्हशींसह मंत्रालयावर पायी मोर्चा (March) काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी दूध उत्पादक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिला आहे. (Otherwise a Foot March with Cows and Buffaloes on the Ministry)

कोरोनामुळे बाजारातील प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आहेत. अजूनही भाव वाढतच आहेत. मात्र या वस्तूंच्या भावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना दुधाला मात्र काहीच भाव मिळत नाही. याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर दिवाळीला रुपयांऐवजी पैशात बोनस जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. महागाई वाढली तरी दुधाचे भाव मात्र जैसे थे कायम आहेत.

हेही वाचा: विद्यार्थ्यांनो, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुद्रांक शुल्क देऊ नका

याउलट पशुखाद्याचे (पेंड) भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पशू संगोपनाचा खर्चही गगनाला भिडताना दिसत आहे. सद्यःस्थितीत दूध डेअरीवर गाईच्या दुधाला प्रतिलिटर केवळ २० रुपयांच्या आत भाव मिळत आहे, असे या संघटनेच्यावतीने राज्य सरकारला पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

loading image