मद्यधुंद वाहनचालकास १० हजार रुपयांचा दंड

मद्यधुंद वाहनचालकास 
१० हजार रुपयांचा दंड
Published on

ओतूर, ता. ७ : ओतूर (ता. जुन्नर) येथील बाजारपेठेत दारू पिऊन मोटारसायकल चालविणाऱ्या एका तरुणाला जुन्नर न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. लहू बबन कोळपे (वय २८, रा. वनकुटे, ता. संगमनेर), असे दंड झालेल्या चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळपे गुरुवारी (ता. ६) सायंकाळी सातच्या सुमारास ओतूर बाजारपेठेत युनिकॉर्न मोटारसायकलवरून (क्र. एमएच १६ डीजे ०९२७) मद्यधुंद अवस्थेत जात होता. ओतूर पोलिसांनी त्याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला. हवालदार नामदेव बांबळे यांनी या प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी शुक्रवारी कोळपेला जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १० हजार रुपयांचा दंड सुनावला. ही कारवाई प्रभारी पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीरे, नामदेव बांबळे, संगीता दिघे, अतुल भेके व आशिष जगताप यांच्या पथकाने केली. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बाजगीरे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com