कांद्यास वाढत्या उष्णतेचा ओतूर परिसरामध्ये फटका

कांद्यास वाढत्या उष्णतेचा ओतूर परिसरामध्ये फटका

Published on

ओतूर, ता.२१ : ओतूर व परिसरात (ता.जुन्नर) उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याचा कांदा पिकास फटका बसत आहे. त्यामुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ओतूरला सकाळी दव पडते तर दुपारी उन्हाचा पारा वाढतो. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
तालुक्यातील ओतूर, उदापूर, डिंगोरे, बल्लाळवाडी, नेतवड, माळवाडी, पिपंळगाव जोगा, कोळवाडी, वाटखळ, मढ, पारगाव, खिरेश्वर, सांगनोरे, मांदारणे, रोहकडी, खांमुडी आदी गावांत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे कांद्यावर करपा, बुरी, मव्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. तापमान वाढीमुळे लाल कोळी रोगाचा ही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. शेतकऱ्याला कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. मागास कांद्याच्या फुगवणीवर मोठा परिणाम होणार आहे. हरभऱ्यावर हिरवी आळी, काळा मवा, तांबेरा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी औषध फवारणी करून पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
एकूणच उन्हाचा चटका वाढल्याने शेतीमालाच्या विशेषता कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ होणार असून उत्पादनात ही घट होणार आहे, असे दिसून येते आहे.

01566

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com