Oture Police Reunion: ओतूर पोलिसांच्या दक्षतेने हरवलेल्या ७५ वर्षीय महिलेची पतीशी सुखरूप भेट

ओतूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या ७५ वर्षीय केशरबाई काळे यांची पतीशी सुरक्षित पुनर्भेट; आश्रमात दिलेल्या आधारानंतर नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्दगी
Otur Police reunite 75-year-old woman with husband

Otur Police reunite 75-year-old woman with husband

Sakal

Updated on

ओतूर : जामखेड तालुक्यातील धनेगाव येथून कोणासही काही न सांगता निघून आलेल्या ७५ वर्षीय महिलेला ओतूर पोलिसांनी आधार देत सुरक्षित आश्रमात ठेवले. नातेवाईकांचा शोध घेऊन अखेर रविवारी (ता.१३) रोजी सदर महिलेला तिच्या पतीच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.ओतूर पोलिसांच्या दक्षतेने ७५ वर्षीय महिलेची तीच्या पतीशी सुखरूप भेट झाली असल्याने परीसरातून ओतूर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com