

Otur Police arrested six members of an interstate robbery gang and recovered weapons, live cartridges and a stolen Bolero vehicle.
Sakal
पराग जगताप,
ओतूर : ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाईत अटक केली. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार हत्यारे आणि चोरीची बोलेरो जीप असा १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांतील दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरीचे एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.