Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

ओतूर पोलिसांची तांत्रिक तपासात मोठी कामगिरी; विविध जिल्ह्यांतून तब्बल २५ गहाळ मोबाईल हस्तगत करून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
Otur police recover 25 missing phones worth ₹6.5 lakh.

Otur police recover 25 missing phones worth ₹6.5 lakh.

Sakal

Updated on

ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणांहून गहाळ झालेले तब्बल २५ मोबाईल फोन शोधून काढण्यात ओतूर पोलिसांना यश आले आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे सहा लाख ५० हजार रुपये असून, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी हे मोबाईल विविध जिल्ह्यांतून ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com