ओतूर रुग्णालय मनुष्यबळाअभावी ‘आजारी’

ओतूर रुग्णालय मनुष्यबळाअभावी ‘आजारी’
Published on

ओतूर, ता. ७ : ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत आणि एक्स-रे सारख्या आधुनिक सुविधा असूनही, आवश्यक मनुष्यबळाअभावी ते ‘आजारी’ पडले आहे. डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांच्या तीव्र कमतरतेमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
रुग्णालयात सुविधा उपलब्ध असूनही, रुग्णांना उपचारासाठी नारायणगाव, जुन्नर किंवा मंचर येथे जावे लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि आपत्कालीन परिस्थितीत ही समस्या गंभीर बनते, ज्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ‘इमारत सुसज्ज, मग कर्मचारी कुठे?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
काही कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाल्याची तक्रार माजी आमदार बाळासाहेब दांगट व सामाजिक कार्यकर्त्या मंदा दांगट यांनी केली आहे. रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, तात्पुरत्या बदल्या रद्द कराव्यात आणि २४ तास पूर्ण क्षमतेने सेवा देण्यासाठी आवश्यक कर्मचारी नेमावेत, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या आरोग्य सुविधेचा नागरिकांना लाभ मिळत नसेल, तर त्याचा उपयोग काय? आरोग्य विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ओतूर ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ पुरवावे, जेणेकरून परिसरातील हजारो नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com