ओतूरच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना थंड पाण्याची आंघोळ

ओतूरच्या आश्रमशाळेत
विद्यार्थ्यांना थंड पाण्याची आंघोळ
Published on

ओतूर, ता. ५ : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील गाडगे महाराज अनुदानित आश्रमशाळेत पावसाळ्यातही विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सुविधा मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. कडाक्याच्या थंडीत आणि पावसात थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
येथील निवासी शाळेत शेकडो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाळेत गरम पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लहान मुलांना सक्तीने थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शाळा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गीझर किंवा सौर बंबाची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या संदर्भात आश्रमशाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळू शकली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईबद्दल पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com