ओतूरमध्ये सायकल रॅलीतून शिवरायांना अभिवादन

ओतूरमध्ये सायकल रॅलीतून शिवरायांना अभिवादन

Published on

ओतूर, ता. २४ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ओतूर सायकल ग्रुपने ओतूर (ता. जुन्नर) ते शिवनेरी शिवजन्मभूमी अशी भव्य सायकल रॅली आयोजित केली होती. सायकल रॅलीचे हे चौथे वर्ष असल्याची माहिती अध्यक्ष जयसिंग डुंबरे व सेक्रेटरी गणेश डुंबरे यांनी दिली.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलपटूंना आमदार शरद सोनवणे, संतोष डुंबरे, बाळासाहेब हाडवळे, मनोज पटेल, सुदर्शन शिंदे, मनोज घोंगडे यांनी टी शर्टचे सौजन्य दिले. यावेळी लकी ड्रॉ मार्फत अनेक बक्षिसांचे वाटप करण्यात आली. युवा उद्योजक हर्षल भाटे, राजेश बोबडे, कॅन्सर तज्ञ डॉ. अमोल डुंबरे, प्रतिभा नलावडे यांच्या वतीने चार सायकल लकी ड्रॉतील विजेत्यांना देण्यात आल्या. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉ. छाया तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे, युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोलप, ‘आम्ही जिजाऊंच्या लेकी’च्या संस्थापिका अक्षदा पानसरे-मांडे यांनी सर्व सायकलस्वारांना पदक बहाल केली.
सर्व सायकलपटूंना ऋषी डुंबरे यांनी ५०० कॅपचे वाटप केले. रॅलीमधील प्रत्येकाला काही ना काही बक्षीस मिळावे यासाठी प्रदीप मुरादे, डॉ. वैभव गायकर प्रकाश हिंगणे, आदेश डुंबरे, नाजिम तांबोळी, धनंजय पो. डुंबरे, शेखर ढमाले, अंकुश ढमाले, संतोष पानसरे, विजय तांबे, राजवीर तांबे, कृष्णा तांबे, सचिन तांबे, नितीन डुंबरे, विघ्नहरचे संचालक धनंजय डुंबरे, अनुराग फापाळे, नीलेश कवडे, शालन वाकचौरे, जालिंदर सरोदे, दत्तात्रेय बोडके, सुभाष लोहोटे, भाऊसाहेब मुरादे, प्रसाद वल्हवणकर, जयेश हांडे, गणपत फापाळे, संतोष डुंबरे, आतिश डुंबरे, दीपक मंडलिक, गीता डुंबरे, गणेश शिंदे, गणेश तांबे, शार्वी डुंबरे, ऋषिकेश गिते, राजेश पानसरे, महेश डुंबरे, कुणाल लांडगे, सिद्धेश डुंबरे आदींनी वेगवेगळ्या वस्तुरूपाने व रोख स्वरूपात बक्षीसे दिली व सर्व स्पर्धकांना प्रेरणा दिली.
यावेळी ग्राम विकास मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे, डॉ. छाया तांबे, मोहित ढमाले, प्रशांत डुंबरे, सचिन घोलप, वसंत डुंबरे, डॉ. भरत घोलप, ए. डी. वाकचौरे, महेंद्र पानसरे, विक्रम नलावडे, सोपान नलावडे, जयसिंग डुंबरे, मारुती घाडगे, गणेश डुंबरे, रवींद्र डुंबरे, पंकज घोलप, हर्षल भाटे, प्रकाश डुंबरे, आनंदराव डुंबरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी केले.

01589

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com