
‘सत्तेत राहून नेत्यांनी स्वतःसाठी लाभ उठवला आणि ते खुर्चीसाठी शिवसेना सोडून गेले. मात्र, आजही कट्टर शिवसैनिक जागेवर आहे.
ओतूर - ‘सत्तेत राहून नेत्यांनी स्वतःसाठी लाभ उठवला आणि ते खुर्चीसाठी शिवसेना सोडून गेले. मात्र, आजही कट्टर शिवसैनिक जागेवर आहे, याचेच प्रत्यय जुन्नर तालुक्यात घेतलेल्या चिंतन बैठकीवेळी उपस्थित जनसमुदायातून दिसून येतो,’ असा प्रतिपादन शिवसेना उपनेते व आमदार सचिन अहीर यांनी केले.
ओतूर (ता. जुन्नर) येथे शिवसेनेच्या चिंतन बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, अशोक खांडेभराड, दिलीप बाम्हणे, संभाजी तांबे, शरद चौधरी, माउली खंडागळे, गणेश कवडे, दिलीप डुंबरे, अविनाश बलकवडे, संजय गाढवे, मंगेश काकडे, योगेश पाटे, आशिष शहा, जीवन शिंदे, समीर भगत, सुनील मेहेर, सुरेश भोर, गुलाब पारखे, आनंद रासकर, अजित सहाने, मोहन बांगर, विशाल बनकर, मनोहर डोंगरे, धोंडिभाऊ पानसरे, निलीमा तांबे, ज्योती महाबरे, मंजुश्री डुंबरे, विठ्ठल तांबे, बबन तांबे, अॕड. जयराम तांबे, सीताराम तांबे आदी उपस्थित होते.
अहीर म्हणाले, ‘भाजपने शिवसेना पक्षाला हायजॅक करण्याचा डाव आखला व याला शिरूर लोकसभेचे माजी खासदार व जुन्नरचे माजी आमदार बळी पडले. खासदार स्वतः निवडून येतात, मग आमदार का निवडून येत नाहीत? हा विचार आमदारांनी करायला हवा होता. येथील मागील विधानसभेची शिवसेनेची जागा भाजपमुळे गेली. सत्तेत राहून नेत्यांनी स्वतःसाठी लाभ उठवला आणि ते खुर्चीसाठी शिवसेना सोडून गेले आहेत. मात्र, आजही कट्टर शिवसैनिक जागेवर आहे, याचेच प्रत्यय जुन्नर तालुक्यात घेतलेल्या चिंतन बैठकीवेळी उपस्थित जनसमुदायातून दिसून येतो. मागील विधानसभेची शिवसेनेची जागा भाजपमुळे गेली.’
मिर्लेकर म्हणाले, ‘गद्दारांनो, नियती तुम्हाला माफ करणार नाही. शरद सोनवणे यांनी चूक केली. त्यांना आम्ही आमदार करणार होतो, परंतु ते आता आमदार होऊ शकत नाही. ज्या भाजपच्या वळचणीला गेलेत, त्या पक्षाच्या बुचके यांना उमेदवारी मिळणार, मग सोनवणे यांचे काय होणार?’
यावेळी संभाजी तांबे यांनी प्रास्ताविक, दिलीप डुंबरे यांनी सूत्रसंचालन केले. अॕड. जयराम तांबे यांनी आभार मानले.
शिवसेना हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना विधानसभेसाठी २८८ जागा लढविण्याची तयारी दर्शवली असून, यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच कामाला लागावे. यापुढे राष्ट्रवादी बरोबर युती नाही, ही सुरवात जुन्नर विधानसभा मतदारसंघापासून करणार आहे. विधानसभेला शिवसेना उमेदवार उभा करणार आहे.
- सचिन अहीर, शिवसेना उपनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.