

Otur Police Action | Soybean Theft Case
esakal
जुन्नर : ओतूर येथील जाकमाथा येथे कांदा चाळीत ठेवलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला ओतूर पोलिसांनी व ग्रामस्थांनी पकडून मोठी कारवाई केली. या कारवाईत चार सोयाबीनचे कट्टे आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले छोटा हत्ती वाहन असा एकूण ३ लाख १९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.