ओतूरच्या चैतन्य विद्यालयात गुणवंतांचा गौरव

ओतूरच्या चैतन्य विद्यालयात गुणवंतांचा गौरव
Published on

ओतूर, ता. २३ : ग्राम विकास मंडळ संचालित ओतूरच्या (ता. जुन्नर) चैतन्य विद्यालयात दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या २८ विद्यार्थ्यांचा आणि नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा गुणगौरव करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी प्रभाकर तांबे, रघुनाथ तांबे, छबूराव तांबे, इंदुमती डुंबरे यांच्या हस्ते गुणवंतांना मेडल व पेढे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुखपदी निवड झालेल्या सुदेष्णा गाढवे, मनोहर वामन आणि दक्षिण आफ्रिकेतील अल्ट्रा मॅरेथॉनमधील कामगिरीबद्दल अमोल तांबे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी इंदुमती डुंबरे यांनी प्रथम पाच विद्यार्थ्यांना ५,५०० रुपयांचे रोख बक्षीस दिले, तर विमलताई डुंबरे यांनी महापुरुषांच्या चरित्रांचे संच भेट दिले. जयश्री डुंबरे यांनी संस्कृती बारे हिला रोख पारितोषिक दिले. सुदेष्णा गाढवे व यतीन शेटे यांनी डिजिटल स्कूलसाठी आर्थिक मदत जाहीर केली.
यावेळी उपाध्यक्ष प्रभाकर तांबे, खजिनदार रघुनाथ तांबे, पंकज घोलप, प्रकाश डुंबरे उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रतीक अकोलकर यांनी प्रास्ताविक केले, संतोष कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब खाडे, मिलिंद खेत्री व सहकाऱ्यांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com