जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
ओतूर, ता. ३ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ज्ञाता एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड कौन्सिलिंग सेंटर, नारायणगावच्या माध्यमातून घेण्यात येणारा दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या तीन विद्यार्थ्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जुन्नर तालुक्यातील पहिल्यांदाच एकाच वेळी तीन मुलांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केल्याने संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक ज्ञानेश्वर ढोमसे यांनी मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्यांमध्ये सुनील टाव्हरे या विद्यार्थ्याने डोळ्याला ब्लाइंड फोल्ड लावून केवळ २७ सेकंदामध्ये पिरॅमिड क्यूब सोडविला आहे. तर निरंजन शारदा जंगले या ११ वर्षीय इयत्ता ५वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने श्रीदासबोध ग्रंथातील २२९ शब्द केवळ दोन मिनिटांमध्ये डोळे बंद करून ब्लाइंड फोल्ड लावून वाचन केलेले आहेत. त्याचबरोबर विहा स्वप्निल जुन्नरकर या विद्यार्थिनीने केवळ एका मिनिटांमध्ये ३८ फ्लॅश कार्ड ओळखले तेही डोळे बंद असताना. यासाठी तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या रेकॉर्ड मॅनेजर मानसी सतीजा यांनी याची अधिकृत माहिती दिली आहे.
सर्व विद्यार्थी मागील एक वर्षापासून नारायणगाव येथील ज्ञाता एज्युकेशनल रिसर्च अँड काउंसेलिंग सेंटर या संस्थेच्या दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी झाले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये त्यांना ब्रेन जिम, मेडिटेशन यासारखे अनेक मेंदूला चालना देणारे अनेक व्यायाम शिकविले गेले.
आजच्या टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पिढीमध्ये आपली एकाग्रता आणि अंतर्ज्ञान विकसित करणाऱ्या या विद्यार्थ्यांना आदर्श मानले जात आहे. या तीनही विद्यार्थ्यांच्या विशेष बुद्धिमत्तेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

