ओतूरची शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल
ओतूर, ता. २४ : ओतूर (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ ने यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सवांतर्गत घेतलेल्या जिल्हास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत लहान मुलांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर लेझीममध्येही लहान मुलांच्या गटाचा तृतीय क्रमांक आला.
फुलगाव (ता. हवेली) येथे या स्पर्धा पार पडल्याची माहिती मुख्याध्यापिका सीमा डुंबरे यांनी दिली. जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषेमध्ये राजवर्धन सुपेकर, युगंधर मंदिलकर यांनी बाजी मारली. मुलांच्या लेझीम संघाने राज्यातील सांस्कृतिक, पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक विषयावर प्रात्यक्षिक सादर केले.
स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील मार्गदर्शक शिक्षिका माधुरी शेटे, वनिता जाधव, सतीश नलावडे, सुदेष्णा गाढवे, उषा भवारी, ज्योती शिरसाठ, रूपाली गायकर, योगिता बुट्टे, संगीता ढाकणे यांनी मार्गदर्शन केले.
त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन डुंबरे, सदस्य नितीन पानसरे, जितेंद्र घुले, प्रतीक्षा ढोकळे, पूजा दिवेकर, विद्या हाडवळे, कविता डुंबरे, डॉ. गायकर, रेश्मा डुंबरे, सुधीर डेरे, लक्ष्मण फापाळे, कमलाकांत मुंढे, अशोक लांडे, अशोक गोडसे, मुख्याध्यापिका सीमा डुंबरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

