आंबेठाण - आम्हा शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा लढा हा केवळ मतांसाठी नसून तो सर्वसामान्य लोकांच्या वेदना थांबविण्यासाठी आहे. मागील सहा महिन्यांत जवळपास १२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आजपर्यंत आम्ही गांधी मार्गाने आंदोलन केले असून २ ऑक्टोबरनंतर आमचा लढा हा गांधी मार्गाने नसेल असा स्पष्ट इशारा माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आंबेठाण (ता. खेड) येथे दिला.