
पुणे : पुणे महापालिकेतर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मोबाईलचे बिल न भरल्याने आज (ता. १९) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईलची आऊटगोईंगची सेवा बंद झाली होती. त्याचा परिणाम कामकाजावर झालाच, पण फोन का लागत नाहीत असा प्रश्न पडल्याने प्रशासन चक्रावून गेले होते. मात्र, सुमारे दीड तासाच्या अडथळ्यांनंतर ही सेवा पुन्हा सुरु झाली.