
पुणे : प्रशस्त आणि अद्ययावत ऑफिस, तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहावे यासाठी कंपन्या घेत असलेली काळजी, असे पोषक वातावरण माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात मिळते. मात्र कंपनीतून बाहेर पडताच वाहतूक कोंडी, अपुरे व दुरवस्था झालेले पदपथ, त्यावर झालेली अतिक्रमणे, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, काही ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, मेट्रोमार्गापर्यंत चालत जाण्यासाठी असलेले अनेक अडथळे, अशी स्थिती सध्या औंध, बाणेर, पाषाण, बालेवाडी आणि म्हाळुंगेमधील आयटी परिसरात दिसत आहे.