
खडकवासला : मागील सात महिन्यांत हवेली तालुक्यातून एक लाख ५ हजारांहून अधिक अर्जांची नोंद करून दाखल्यांचे वितरण केले आहे. हवेली तालुका महसूल विभागाने एक जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्रे व पात्रता अर्जांची मोठ्या प्रमाणावर छाननी व वितरण केले आहे. एकूण एक लाख पाच हजारांहून अधिक अर्जांवर प्रक्रिया झाली असून, यापैकी एक लाख चार हजार ९९३ दाखले वितरित झाले आहेत.