
पुणे : शहरातील टिंबर मार्केट व्यापारी मित्रमंडळ, क्षत्रिय किराड समाज यांच्यावतीने आणि सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्यातर्फे भवानी पेठेतील टिंबर मार्केट असोसिएशनच्या कार्यालयात वारकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिरात एक हजार दोनशे वारकऱ्यांची तपासणी झाली. याप्रसंगी सहाशे वारकऱ्यांना मोफत चष्म्याचे वाटप झाले.