PMPML Buses : ‘पीएमपी’ बसच्या १३०० हून अधिक फेऱ्या; पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी, देहूसाठी भाविकांना सुविधा
Palkhi Yatra : संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पुण्यात मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत आहेत. त्यांच्या सुविधेसाठी पीएमपी प्रशासनाने ३१२ बसगाड्यांद्वारे १३०० हून अधिक फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त केवळ पुणेच नव्हे, तर राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने पुण्यात दाखल होतात.