Bhimashankar : शेवटच्या श्रावणी सोमवारी दीड लाख भाविकांनी घेतले भीमाशंकराचे दर्शन

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पाचव्या व शेवटच्याआमावसी सोमवारी सुमारे दीड लाख भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय, अशा घोषणा देत हलक्या श्रावण सरी व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.
Bhimashankar
Bhimashankarsakal
Updated on

शिनोली : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पाचव्या व शेवटच्याआमावसी सोमवारी सुमारे दीड लाख भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय, अशा घोषणा देत हलक्या श्रावण सरी व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.या वेळी शिवलिंगावर आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांनी पवित्र शिवलिंगावर जल्लाभिषेक केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com