
पुणे : जपानी मेंदुज्वर (जॅपनीज एन्सेफेलायटीस – जेई) सारख्या गंभीर आजारापासून बचाव व्हावा यासाठी शहरात १ ते १५ वयोगटातील मुला-मुलींना महापालिकेकडून ‘जेई’ ची लस देण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने १ मार्च पासून मुला-मुलींसाठी लसीकरण मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत साडेतीन महिन्यात (ता. १६ मे) २ लाख ९२ हजार ५०१ हजार मुला– मुलींना लस दिली गेली आहे. परीक्षा, सुट्ट्यांमुळे लसीकरणात अडथळा आल्याने लसीकरण मोहीम गेल्या महिन्यात मंदावली आहे.