
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत राज्यातील आठ हजार ८६३ शाळांमधील एक लाख नऊ हजार १११ जागांकरिता तब्बल तीन लाख पाच हजार ८२८ अर्ज आले आहेत. या बालकांच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांची शिगेला पोचलेली उत्सुकता आता येत्या सोमवारी (ता. १०) संपणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईनद्वारे प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे.