
शिरूर - परप्रांतीय कामगारांबरोबरच राज्याच्या विविध जिल्ह्यांतून कामाच्या शोधात आलेल्या पन्नास कामगारांना वेठबिगारासारखे राबवून घेत, कामाचे पैसे मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करीत मारहाण करीत डांबून ठेवल्याचा आणि वाच्यता केल्यास धमकावल्याचा गंभीर प्रकार रांजणगाव (ता. शिरूर) एमआयडीसीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी रविवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.