
पुणे - एकीकडे राज्यासह पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर शाही थाटमाट करत खर्च करून विवाह समारंभ करताना पाहायला मिळतो. सध्या मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी विवाहामध्ये आकर्षक सजावट, शाही जेवण, मान्यवरांची उपस्थिती आणि विवाहाच्या अगोदर ‘प्री-वेडिंग शूट’ असे अवाढव्य खर्च करताना अनेक लोक पाहायला जरी मिळत असले, तरी दुसऱ्या बाजूला पुणे शहरात या वर्षभरात जवळपास ५,५०० जोडप्यांनी ‘न्यायालयीन विवाह’ केल्याचे समोर आले आहे.