water connection
sakal
पुणे - महापालिकेकडून समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असताना नवीन सोसायट्यांना नवीन नळजोड घ्यावे लागत आहेत. पण त्यासाठी खासगी प्लंबरकडून आव्वाच्या सव्वा रुपयांची मागणी केली आहे. ही लूट थांबविण्यासाठी प्लंबरला किती शुल्क द्यायचे हे निश्चित केले आहे. पण तरीही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचे प्रकार सुरुच आहेत.