विवेक कोल्हे यांची बातमी- राहाता

विवेक कोल्हे यांची बातमी- राहाता
Published on

ओव्हर-फ्लोचे पाणी लाभक्षेत्रात साठवा ः कोल्हे
राहाता, ता. ५ ः निळवंडे धरणाचे ओव्हर-फ्लोचे पाणी राहाता व कोपरगाव तालुक्यांतील लाभक्षेत्रातील ओढे नाले व बंधा-यांत साठविण्यात यावे. त्यातून गावतळी व पाझर तलाव भरावेत, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ओव्हर-फ्लोचे पाणी केवळ नदीपात्रातून वाहून जाऊ न देता त्याचा नियोजनबद्ध वापर करून ते लाभक्षेत्रात साठवून जिरवावे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. पुरेसा पाऊस नसल्याने लाभक्षेत्रात पाण्याची गरज आहे. विहिरी अद्याप कोरड्या आहेत. जलसंपदा, महसूल व स्थानिक यंत्रणांनी एकत्रित येऊन या पाण्याच्या साठवणुकीचे नियोजन करावे.
शेतक-यांची तशी मागणी आहे. धरणे भरली आणि यंदा लाभक्षेत्रात मात्र पुरेसा पाऊस नाही. पशुधनाला लवकरच हिरव्या वैरणीची गरज भासू लागेल. ओव्हर-फ्लो पाणी लाभक्षेत्रात जिरले, तर शेतक-यांना वैरणीची पिके घेता येतील. तसेच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com