ओव्हरहेड केबल्समुळे पुणे झालं विद्रुप; महापालिका उचलणार मोठे पाऊल

(overhead cables PMC will appoint Private agency for survey
(overhead cables PMC will appoint Private agency for survey

पुणे : शहरात वेगवेगळ्या बिल्डिंग, खांब आणि झांडावर लोंबकळणाऱ्या केंबल्समुळे पुण्याचे विद्रुपीकरण होत आहे. ओव्हरहेड केबल्सच्या या जाळ्यामुळे प्रशासनाचा महसूलाचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका (PMC) ने शहरभरातील ओव्हरहेड केबलचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

''महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार,शहरात लोंबकळणाऱ्या टीव्ही, इंटरनेट, ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर केबल साठी कोणतीही तरतूद केलेली नाही. शहरातील अनधितकृत लोंबकळणाऱ्या केबल्स जाळ्यामुळे शहरातील क्षितीजे(Skyline) खराब होत असून शहर विद्रुप होत असल्यामुळे त्या हटवाव्या लागतील ''अशी माहिती नागरी रस्ता विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी. कुलकर्णी यांनी एका वृत्तपत्राशी संवाद साधताना दिली.

cable-on-flyover.jpg
cable-on-flyover.jpg
(overhead cables PMC will appoint Private agency for survey
लहान मुलांमध्ये आढळतोय MIS-C आजार; पुण्यात आढळले रुग्ण

''पुणे महापालिका शहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबल्सच्या जाळ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पुणे महापालिका प्रत्येक केबल मालकाला या ओव्हरहेड केबल हटवून, भूमिगत ठेवणे बंधनकारक करणार आहे. तसेच यासाठी प्रती मिटर केबलनुसार वार्षिक रक्कम आकारली जाणार आहे. त्यामुळे सर्व केबल अधिकृत होतील ज्यामुळे प्रशासनाचा महसूल देखील वाढेल.'' अशी माहितीही कुलकर्णी यांनी दिली.

प्रशासन या सर्व्हेसाठी एक किंव एकापेक्षा जास्त संस्थाची नेमणूक करू शकते. पुढील 3 वर्षात हे काम पूर्ण व्हायला हवे. तसेच पुणे महापालिका केबल कंपन्यांकडून शुल्क वसूल करुन त्यांना भूमिगत ठेवण्यास सांगून अधिकृत करण्यासाठी कर्जमाफी योजना देखील सुरू करणार आहे अशी माहिती मुख्य अभियंता यांनी दिली. या एजन्सीला शहरातील बेकायदेशीर भूमिगत केबल्स आणि त्यानंतर ओव्हरहेड केबल्सच्या सर्वेक्षणातून सुरुवात करावी लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

(overhead cables PMC will appoint Private agency for survey
पीएमपीने बिझनेस प्लॅन: ‘बीआरटी’वर अधिक लक्ष द्या
 overhead cables
overhead cables

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com