

पुणे : कार्यक्षेत्राबाहेर जाऊन पथारी परवान्यांचे वाटप करणे, २ हजार चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या मिळकतीचे कर मूल्यांकन करण्याचे अधिकार नसतानाही त्याचे उल्लंघन करणे, थकबाकी वसुली करताना संदिग्धता ठेवणे अशा कारणामुळे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्यावर दोन पगारवाढ रोखण्याची कारवाई आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी केली आहे.