esakal | 'ऑक्सिजनची पातळी होती कमी पण मी जिंकलो'

बोलून बातमी शोधा

'Oxygen level was low but still dnyaneshwar khandve recovered from corona

'ऑक्सिजनची पातळी होती कमी पण मी जिंकलो'

sakal_logo
By
सुषमा पाटील.

रामवाडी : HRCT Score - 22, ऑक्सिजन पातळी - 60 च्या खाली अशा गंभीर अवस्थेत कोरोनावर मात करून ज्ञानेश्वर बळवंत खांदवे ( वय 36) रा .लोहगाव ) या तरुणाने सकारात्मक विचार व उपचार याच्या जोरावर विजय मिळवला.

ज्ञानेश्वर खांदवे यांच्या घरातील आईवडील भाऊ व वहिनी यांना कोरोना झाल्याने दवाखान्यात त्यांची ये-जा सुरू होती. सर्वजण बरे होऊन घरी परतले पण, या धावपळीत सात दिवसाने खांदवे यांना दम लागत असल्याने नातेवाईक सतीश दोरगे हे तपासणीसाठी त्यांना कोव्हिड सेंटर घेऊन गेले. खांदवे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. HRCT score त्यावेळी 9 होता. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी दिलेली मेडिसिन घेऊन घरातूनच उपचार सुरु होते पण, दोन दिवसाने खुपच त्रास वाढू लागला अशा वेळी दोरगे यांनी सर्वत्र चौकशी केली असता कुठे ही बेड उपलब्ध नव्हता. अशा वेळी डॉ. उषा मोरे यांच्या मदतीने चंदननगर येथील कोहकडे हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला.

रुग्णाची अवस्था गांभीर होती ताप असल्याने त्यांची HRCT केली असता score 22 पर्यत पोहचला तर ऑक्सिजन लेवल 60 च्या खाली आली होती. अशा वेळी डॉक्टरांच्या डोळ्यासमोर एकमेव टार्गेट होते ह्या तरुणाचे प्राण वाचले पाहिजे. नातेवाईकांकडून वेळेत मिळालेली सहा Remdesivir injection व दोन प्लाझमाबॅग त्यामुळे डॉक्टर उपचारांना यश मिळत गेले. रुग्णांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. अखेर तेरा दिवसांने काल ( ता. 29 ) रुग्णांला डिस्चार्ज मिळाला.

हेही वाचा: खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर; प्रकृतीबद्दल विश्वजीत कदम यांनी दिली माहिती

ज्ञानेश्वर खांदवे म्हणाले, ''डॉक्टररुपी देवाने माझे प्राण वाचवले . ते माझ्या वर उपचार करत असताना मी घाबरुन न जाता सकारात्मक प्रतिसाद देत राहिलो. आलेल्या संकटावर मात करून मला बाहेर पडायचे होते. सर्वांना सांगतो कोरोना झाल्यावर घाबरू नका वेळेत दवाखान्यात जाऊन उपचार घ्या.

डॉ .अंजली कोहकडे '' खांदवे पेशंट माझ्या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळी आणले त्यावेळी ते क्रिटीकल कंडिशनमध्ये होते. हा तरुण पेशंट वाचला पाहिजे सर्वतोपरी आमच्या स्टाफ कडून प्रत्यन सुरू होते. मी रात्रभर आयसीयू मध्ये बसुन होते, पहाटे चार वाजता पेशंटच्या तब्येत सुधारू लागली. मी माझ्या पेशंटला वाचवू शकले याचा मला समाधान व आनंद वाटत आहे''