ओझरमध्ये गुरुवारी ऊस पीक परिसंवादाचे आयोजन

ओझरमध्ये गुरुवारी ऊस पीक परिसंवादाचे आयोजन
Published on: 

ओझर, ता. १३ : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने गुरुवारी (ता. १५) सकाळी १० वाजता श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे ऊस पीक परिसंवादाचे आयोजन केले आहे. एकरी १०० टन ऊस उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने ऊस शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने यांच्या प्रमुख उपस्थितीत १३ वी ऊस परिषद होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय केळी महासंघाचे अध्यक्ष किरण चव्हाण राहणार असून, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी डॉ. संजीव माने, अनंतराव निकम, महेंद्र घाटगे आणि सुरेश मुगदूम हे तंत्रज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेत आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि खत-पाणी व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य ऊस उत्पादक संघ जुन्नर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष काळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com