

Pabal's Dhanashree Gavhane Punde selected as Drug Inspector through Maharashtra Public Service Commission
Sakal
पाबळ : जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर पाबळ (ता. शिरूर) येथील धनश्री निळकंठ गव्हाणे–पुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत औषध निरीक्षक पदाला गवसणी घातली. धनश्री यांच्या निवडीमुळे एकाच कुटुंबात चार अधिकारी घडविण्याचा मान गव्हाणे कुटुंबाला मिळाला आहे. विवाहानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत मिळवलेल्या या यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.