The Pabal-Thitewadi-Kendur road has been riddled with potholes, leaving it in a dilapidated state.
sakal
पाबळ - बेल्हा-जेजुरी महामार्गाला जोडणाऱ्या शिरूर तालुक्यातील पाबळ- थिटेवाडी-केंदूर या महत्त्वाच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पाबळ ते थिटेवाडी दरम्यानच्या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरणासाठी जागोजागी साइडपट्टी उखडून ठेवल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे.